जळगाव (प्रतिनिधी) पिरामल फायनॅन्स महाराष्ट्रातील जळगाव शहरामध्ये प्रथमच गृह प्रकल्पांचे प्रदर्शन, ‘गृह उत्सव’, आयोजित करणार आहे. या उपक्रमाद्वारे पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना किफायतशीर गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचे कंपनी चे उद्दिष्ट आहे. पिरामल कॅपिटल आणि हाऊसिंग फायनॅन्स लिमिटेड; जिचा येथे पिरामल फायनॅन्स म्हणून उल्लेख येत आहे; ही पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड च्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे; जी भारतातील आर्थिक सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे.
हे ‘गृह उत्सव’ १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत खानदेश सेंट्रल मॉल, स्टेशन रोड, प्रताप नगर, जळगाव महाराष्ट्र, ४२५००१ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात कंपनी २५ बी पी एस च्या सूट सह आणि सरसकट लॉग इन् शुल्क रू ४९९ फक्त घेऊन जागेवरच, त्याच वेळी गृह कर्ज मंजूरीची सोय उपलब्ध करून देणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी इच्छुक व्यक्ती आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन येऊ शकतात आणि तेव्हाच त्यांच्या स्वप्नातल्या घरासाठी कर्ज मंजूरी मिळवू शकतात. याशिवाय, ग्राहकांना एन अँड एल असोशिएटस्, देव कन्स्ट्रकशनस्, शेटे बिल्डरस् अँड लँड डेव्हलपर, बिकन डेव्हलपर, द्वारकामल कन्स्ट्रकशनस्, शोभाराम कन्स्ट्रकशनस् आणि बिबा इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या १४ डेव्हलपरस् च्या जवळपास २० प्रकल्पांच्या विशेष ऑफरस् चा लाभ देखील मिळेल.
या उपक्रमाबाबत बोलताना पी सी एच एफ एल चे व्यवस्थापकीय संचालक श्री. जयराम श्रीधरन म्हणाले की, “ सहजतेने गृह कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने ‘गृह उत्सव’ हे प्रदर्शन आम्हाला जळगाव मध्ये आयोजित करताना खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र पिरामल फायनॅन्सच्या महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. राज्यात आपले अस्तित्व विस्तारीत करणे एवढेच पिरामल फायनॅन्सचे उद्दिष्ट नाही तर येत्या काळात येथील ग्राहकांना वेगवेगळ्या योजना आणि उत्पादने उपलब्ध करून देणे हे सुद्धा आमचे ध्येय आहे. गृह उत्सव हे ग्राहकांसाठी एक अनोखे व्यासपीठ आहे जेथे त्यांना निरनिराळ्या २० किफायतशीर गृह प्रकल्पांबाबत सहजतेने माहिती आणि त्याच जागेवर तेव्हाच सहजतेने गृह कर्ज मंजूरी अशा आकर्षक सुविधा मिळतील.”
पिरामल फायनॅन्सच्या महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, सांगली, सातारा, पेण, रोहा, सोलापूर अशा वेगवेगळे महत्त्वाच्या शहरांमध्ये ७२ शाखा आहेत. कंपनीने राज्यामध्ये आपले अस्तित्व पुढील ३ वर्षात अजून जास्त विकसित करण्याचे आणि आपली लोन बूक गृह कर्ज, वाहन कर्ज, लघु उद्योगांसाठी कर्ज आणि अशा अन्य अनेक उत्पादने व योजनांच्या माध्यमातून वाढविण्याचे योजले आहे.