जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जयकिसान वाडीत अज्ञात चोरट्यांनी घारोफोडी करत तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हे घर महावितरणच्या कनिष्ठ अभियंता हर्षा श्रीराम सोनवणे यांचे होते.
कनिष्ठ अभियंता हर्षा श्रीराम सोनवणे या पाचोरा येथे महावितरणमध्ये कार्यरत आहेत. लाॅकडाऊनपासून त्या पाचोरा येथेचे राहत आहेत. त्यामुळे जयकिसान वाडीतील त्यांचे घर बंद होते. परंतू शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. शहर पोलिस घटनास्थळी आल्यानंतर कपाट व त्यातील लाॅकर तुटलेले होते. घरातून ५० हजार रुपये रोख, ६५ हजार रुपये किमतीची ५० ग्रॅमची सोन्याची पोत, १ लाख २५ हजार रुपये किमतीची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, ३२ हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, चांदीचा नेकलेस असा एकूण २ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. दरम्यान, भर वस्तीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते.