जळगाव (प्रतिनिधी) शाहुनगरात सट्टा पेढीवर शहर पोलिसांनी धाड टाकत एका तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर साथीदार पळवून जाण्यात यशस्वी झाले.
शाहुनगरात नुरानी मशीद परिसरात चेतन संजय पिसाळ (वय २५, रा. शाहुनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. चेतन हा काही तरुणांसह परिसरात सट्टा पेढी चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली. परंतू पोलिस आल्याची दिसताच इतर तरुण पळुन गेले. तर चेतन याला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून सट्टा खेळण्याचे साहित्य व पैसे पोलिसांनी जप्त केले.याप्रकरणी रतनहरी गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.