TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

वेकोलीकडून कोळसा मिळत नसल्याने गंभीर स्थिती

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिलेत. केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसापुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी करून नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महाजनकोला विकत असल्याने ते माफक दराने देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी जोशी यांना केली. गेल्या तीन महिन्यापासून केंद्र सरकारकडून महानिर्मितीसाठी अपेक्षित साठ्याच्या ५० टक्केच कोळसा प्राप्त झाला आहे.

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाच्या उपलब्धतेचा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळेस महानिर्मितीकडे उपलब्ध कोळसा आणि तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांची माहिती एका सादरीकरणाद्वारे देण्यात आली. सर्वसाधारणपणे ऐन पावसाळ्यात कोळशाची टंचाई वाढत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचेही निर्देश डॉ राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महाजनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महाजनकोचे संचालक चंद्रकांत संचलन थोटवे, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

विजेच्या मागणीत सतत वाढ होत असल्याने व कोळश्याअभावी वीज निर्मितीत घट झाल्याने महावितरणला खुल्या बाजारातून कमाल मागणीच्या वेळी महागड्या दराने वीज खरेदी करावी लावत असल्याने डॉ. राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भविष्यात कोळसा टंचाई होऊ नये यासाठी कोळसा मंत्रालयासोबत सतत पाठपुरावा करून अधिकचा कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीज टंचाईच्या काळात महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत असल्याने कोळसा खरेदीसाठी महावितरणने अधिकची तरतूद करून ती रक्कम महाजनकोला दिल्याने महाजनकोला कोळसा खरेदी करणे सोपे जाईल, अशी सूचना डॉ. राऊत यांनी केली. यासाठी वेकोलि, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय,केंद्रीय कोळसा मंत्रालय यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोळसा उपलब्धता

२० सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार सध्या महानिर्मितीकडे १ लाख ६३ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा सध्या उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी रोज किमान १ लाख ४६ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा लागतो. केंद्र सरकारच्या वेकोलीसह अन्य कंपन्याकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने ही गंभीर स्थिती ओढवल्याचे यावेळी सांगण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला महाजन कोकडे १४ लाख मेट्रिक टन एवढा साठा उपलब्ध होता. परंतु कोळसा कंपन्यांकडून मागील दीड महिन्यात कमी पुरवठा झाल्याने जेमतेम एक दिवस पुरेल एवढा म्हणजे १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन एवढाच साठा २० सप्टेंबरला उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या या कंपन्यांकडून जुलै महिन्यात अपेक्षित कोळसा पुरवठ्याच्या केवळ ४७.९५ टक्केच कोळसा प्राप्त झाला. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ५२.६४ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ४५.१६ टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात वेकोलीकडून २२१६ मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना केवळ ८७३ मेट्रिक टन कोळसा म्हणजे केवळ ४५.१६ टक्के कोळसा प्राप्त झाला.

वीज निर्मिती कंपन्यांना नियमित कोळसा मिळावा म्हणून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून महानिर्मितीकडून ऑर्डर बुकिंग प्रोग्रामनुसार कोळसा पुरवठा केला जात नसल्याबद्दल वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र या गटाच्या बैठकीत कोळसा पुरवठ्याचे आश्वासन देऊनही अपेक्षित कोळसा पुरवला जात नसल्याकडे यावेळेस सादरीकरणाद्वारे लक्ष वेधण्यात आले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
Next Post

'तयारी हिरवाई प्रकल्पाची' ; महापालिका व मराठी प्रतिष्ठानतर्फे २४ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

July 29, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2025 !

July 7, 2025

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

June 14, 2025

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १९ डिसेंबर २०२४

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group