जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळा शिवारातील एका शेतात सालदाराने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
गोविंदा श्रावण बारी (४२, रा.बारीवाडा, पिंप्राळा) हे नीलेश दुबे यांच्याकडे सालदार म्हणून कामाला होते. आज रविवारी सकाळी ११ ऑक्टोबर रोजी शेतातील काही मजुरांना गोविंदा बारी यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आलेत. दरम्यान, बारी हे शनिवारी दुपारपासून शेतात गेलेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.