जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस त्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हातून मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निघृर्ण हत्या झालेल्या अर्थव्यवस्थेचे व देशातील युवकांच्या बुडवलेल्या रोजगाराचे आज सर्वपित्री अमावस्या निमित्त श्राद्ध घालून एका आगळ्या वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करून राष्ट्रीय बेरोजगार दिवस व अर्थव्यवस्था बचाव दिन साजरा करण्यात आला.
जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने पितृपक्षातील श्राद्ध घालण्याचा आजचा शेवटचा दिवस तसेच सर्वपित्री अमावस्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस या सर्व योगायोगाने आलेल्या या आजच्या दिवशी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारत देशाचे अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला जाऊन एक प्रकारे मोदी सरकारने हेतुपुरस्कर देशाच्या अर्थव्यवस्थेची निर्घुण हत्या केली, त्यामुळे देशांमध्ये आर्थिक मंदीचे संकट निर्माण झाले. तसेच निवडणुकीच्या आधी देशातील युवकांना खोटे आश्वासन देऊन दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आजची परिस्थिती बघता देशातील युवकांकडे पदवी तर आहे, मात्र देशांमध्ये कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही.
अर्थव्यवस्था व रोजगार वाचविण्यामध्ये मोदी सरकार संपूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे. आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवसाच्या निषेधार्थ एक अपयशी पंतप्रधान म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचे व रोजगाराची हत्या करणारे केंद्रातील भाजप सरकार असल्यामुळे मृत पावलेल्या अर्थव्यवस्थेचे व रोजगाराचे हिंदू परंपरेनुसार सर्व विधी पूर्वक श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मृत पावलेल्या अर्थव्यवस्थेच्या व रोजगाराच्या पिंडाला प्रतीकात्मक कावळ्याने देखील शिवले असल्याचे दिसून आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, शाम तायडे, दीपक सोनवणे, जाकिर बागवान, भरत ललवाणी, सागर शिंदे,शकील शेख,रहीम शेख,अत्तर शेख, कपिल पाटील, हिरा पाटील, पांडू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.