एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून धरणगाव रोडवरील अष्टविनायक कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार करत असताना होणारा खर्च गोरगरीब रुग्णांना परवडत नाही. यासाठी कोरोना + व्हिई पेशन्टला औषधोपचार करणारे खाजगी दवाखान्याना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी प्रांतअधिकारी यांनी निवेदनाव्दारे (दि.९) रोजी करण्यात आली असून त्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
नगरसेवक योगेश महाजन (देवरे) यांच्याकडील निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय निवेदनच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, कोरोना +व्हिई पेशन्टला औषधोपचार करणारे खाजगी दवाखान्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करणेबाबत निवेदन दिलेले आहे. तरी हॉस्पीटला शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आलेली आहे. तरी सदर विषयानुसार योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच याबाबतीत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.