नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचे विमान…हा न्याय आहे का?’ असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारला विचारला आहे.
राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसले आहे जे आपसात बोलत आहेत. त्यामधील एक जवान म्हणतो की, नॉन बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये पाठवून आपल्या जीवाशी खेळ केला जात आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी विरोधी बिलाच्या विरोधात पंजाबमधील आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी आरोप लावला होता की, पीएम मेदींनी देशाच्या विरोधी निती आणि कार्यांनी देशाला कमजोर केले आहे.