TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिनावल येथे तुफान दगडफेक, २० मे पर्यंत गावात संचारबंदी

ट्रान्सफार्मर बंद करुन समाजकंटकांनी साधला डाव ; सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2024
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा (प्रतिनिधी) गावातील विजेचे ट्रान्सफार्मर बंद करुन अंधाराचा फायदा घेत किरकोळ कारणावरुन झालेल्या झालेल्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना दि. १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चिनावल येथे घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर गावात दि. २० मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अचानक झालेल्या दगडफेकीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण !
चिनावल येथील माधुरी महाजन यांनी सावदा पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये त्या दि. १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाँकींग करण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांना वाघोदा रोड ते मेस्कोमळा परिसरात मोठ्याने आरडाओरड सुरु असल्याचे समजले. तसेच काही वेळताच मोठा जमाव त्यांच्या दिशेने येवून दगडफेक करीत असल्याचे त्यांना दिसला. या जमावाने महादेव वाडा, महाजन वाडा परिसरात दगडफेक करीत मोटरसायकलचे देखील नुकसान केले. जमावाच्या वादामध्ये माधुरी महाजन यांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्रस गहाळ झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. काही वेळताच परिस्थितीवर नियंत्रण

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती आणली नियंत्रणात !
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंह, सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांच्यासह है फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांकडून दगडफेकीच्या घटनेचे कारणांचा शोध घेतला जात आहे. गावात फैजपूर, निभोरा, रावेर येथुन अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाचे जवान गावात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी !
दगडफेकीच्या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.

सप्ताहमध्येही खंड
चिनावल गावातील एका भागात हरिनाम अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दगडफेकीच्या घटनेमुळे संचारबंदी लागल्याने या सप्ताहातही खंड पडला आहे. संचारबंदीतून शेतकऱ्यांना मिळावी मुभा चिनावल गावात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत. संचारबंदी लागू झाल्याने शेती व गाव निर्मनुष्य झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढणी योग्य केळी तयार आहे. संचार बंदीमुळे घराबाहेर निघणे शक्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे यासाठी केळी कापणीसाठी तरी किमान संचार बंदीतून मुभा मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत
फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी चिनावल गावात दि. २० मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. गावातील व्यवहार पूर्णपणे बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतात जाणारे शेतमजूर, दैनंदिन उघडणारे आस्थपने, किराणा, दुध डेअरी, हे बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे.

गावात रात्रभर सर्च ऑपरेशन !
गावात मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे, सपोनि जालिंदर पळे, पो उप निरीक्षक खांडबहाले, हे तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव मात्र कायम आहे. सावदा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policesancharbandisavada

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

बालरंग नाट्य प्रशिक्षणात रंगली पालक-विद्यार्थी संवाद कार्यशाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे धरणे आंदोलन ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !

August 29, 2023

महान तत्ववेत्ते भगवान “महावीर”

April 26, 2021

अमळनेरात बजाज फायनान्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड !

January 11, 2023

धुळे : नरभक्षक बिबट्याने घेतला आतापर्यंत तीन बालकांचा बळी !

October 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group