पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी गावाच्या प्रवेशद्वारापासून तर डिव्हायडरवरील सर्व पथदिवे गेल्या एका वर्षांपासून बंद होते. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी त्वरित स्वखर्चाने स्वतः उभे राहून पथदिवे दुरुस्त करून घेतले. त्यामुळे आजपासून पाळधी गावातील रस्ते पथदिव्यांमुळे रस्ते उजळून निघाले आहेत.
रस्त्यावरील असलेल्या अंधारामुळे ग्रामस्थांना गैरसोय होत होती. गावातील ज्येष्ठ पत्रकार यांनी ग्रामस्थांची गैरसोय जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली असता प्रतापराव पाटील यांनी त्वरित स्वखर्चाने स्वतः उभे राहून पथदिवे दुरुस्त करून घेतले. याप्रसंगी माजी सभापती मुकुंद ननावरे, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी पाटील, अमीन पटेल, तसेच गावातली नागरिक यासिन शेठ, दानिश पठाण आदी उपस्थित होते.