पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ दोन तृतीयपंथीयांकडून भयावह प्रकार सुरू असतांना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. लक्ष्मी निभाजी शिंदे (वय ३१) आणि मनोज धुमाळ (वय २२) असे अघोरी कृत्य करणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. शिंदे हा मुंबईचा आहेत तर मनोज धुमाळ हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. (pune crime news)
शुक्रवारी मध्य रात्री रात्री १ ते २ च्या दरम्यान, पुण्यातील (pune) वैकुंठधाम स्मशानभूमीतील चितेजवळ दोन तृतीयपंथी काही भयावह अघोरी कृत्य करत असल्याचं सुरक्षारक्षकाने पाहिले. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. यावेळी दोघं तृतीयपंथी काळ्या बाहुल्या, लिंबू तसेच काही फोटो वापरून अघोरी कृत्य करत होते. तसेच ते काही मंत्राचाही जाप करत असल्याचे दिसून आलं. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.