TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या १९ माजी नगरसेवकांवर सव्वा कोटीच्या नुकसानीचा आरोप ; जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार सुनावणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

  1. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका हद्दीत विकासकांनी विकास न करता एन.ए.करून प्लॉट विक्री केले आहेत. पालिकेने या विकासकांना रक्कम वसुलीच्या नोटीस दिल्यात. परंतु या विकासकांच्या फायद्याच्या दृष्टीने व पालिकेचे नुकसान करून नगरसेवकांनी नागरिकांना विकासाची गरज नाही, असा ठराव केला होता. याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी ठराव रद्द करून नगरसेवकांना अपात्र का करण्यात येऊ नये, अशी विचारणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर आता दि.१० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

धरणगाव नगरपालिका हद्दीत १५ ले-आउट विकासकांनी विकसित न करता प्लॉट विक्री केलेत. नागरिकांना रस्ते, गटारी, पथदिवे आदी मुलभूत सोई सुविधा न दिल्याने एनए केलेल्या १६ ले-आउट मध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. याठिकाणी नगरपालिका विकास करीत नव्हती व विकासक देखील विकास करीत नव्हते. आज देखल अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी तक्रारी दाखल केल्याने धरणगाव नगरपालिकेने या सर्व ‘ले-आउट’वर विकासकांकडे विकासासाठी लागणारा खर्च जवळपास सव्वा कोटी रु. रक्कम मागणी केली. परंतु वारंवार मागणी करून देखील विकासकांनी रक्कम भरली नाही. त्यानंतर पालिका प्रशासनाने या १५ ले-आउट मधील खरेदी-विक्री व्यवहार व बांधकाम परवानग्या थांबविल्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी सदर १५ ले-आउट च्या एन.ए.परवानगी रद्द का करण्यात येवू नयेत?, यासंदर्भात कारवाईचे आदेश केलेत. परंतू विकासकांनी नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना हाताशी घेवून गैर मार्गाने नगरपालिकेच्या हिताचा विचार न करता विकासकांशी संगनमत करीत ठराव क्र. २८१ दि. १० फेब्रु २०१६ रोजी ठराव करून विकासकांना रक्कम भरणे साठी ६ महिन्याची मुदत देवून बांधकाम परवानग्या देण्याचा ठराव केला. परंतु आज ४ वर्षानंतर देखील या १५ ले-आउट ठिकाणी कोणताही विकास नाही, अगर कोणतीही रक्कम भरण्यात आली नाही.

यावर जितेंद्र महाजन यांनी महारष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार सदर ठराव रद्द करून विकासकांकडून रक्कम वसूल करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे जुलै २०१९ रोजी तक्रार केली होती. सदर तक्रारी संदर्भात दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वा. यासंदर्भात सुनावणी होणार असून या सुनावणीत काय कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून आहे.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

‘१५ ले-आउट मधील विकास थांबलेला असून नगरपालिकेचे आर्थिक नुकसान झालेले असल्याने यास जबाबदार नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. सुनावणी योग्य त्या दिशेने झाल्यास जिल्ह्याच्या इतिहासात खळबळ उडवून देणारा हा निर्णय असेल’
– जितेंद्र महाजन, माहिती अधिकार कार्यकर्ते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
Next Post

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भूसावळ दुहेरी हत्याकांड : मुख्य संशयिताकडून दोन पिस्टल, पाच जिवंत काडतूसे जप्त !

June 1, 2024

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

May 15, 2023

शेअर बाजारात सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला ; गुंतणवूकदारांच्या खिशाला फटका

May 19, 2022

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group