धरणगाव (प्रतिनिधी) शहरात काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करताय. दरम्यान, पाण्याच्या शुद्धतेसाठी आवश्यक असलेले ‘आलम’ चा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हा दुषित पाणी पुरवठा होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतू यावरूनच नागरिक फिल्टर प्लांटचा ‘आलम’ खराब असल्याची मिश्कील टिप्पणी करताय.
शहरात काही दिवसांपासून पिवळसर रंगाचा दुषित पाणी पुरवठा होत आहे. पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याच्या शुद्धतेसाठी आवश्यक असलेले ‘आलम’ नामक वस्तू संपल्यामुळे हा दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त आहे. अमळनेर येथील ठेकेदाराकडून ‘आलम’ची मागणी करण्यात आली असल्याचेही कळते. धरणगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. तशात दुषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतू त्यावर तात्काळ मार्ग काढण्यात आला असून उद्यापासून पुन्हा शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख किशोर खैरनार यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.
“