TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांनी दिली पालिकेवर धडक ; बांगड्यांचा आहेर देत केला निषेध ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भर पावसाळ्यातही पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोहार गल्लीतील महिलांनी आज नगरपालिकेवर धडक दिली. एवढेच नव्हे तर, धरणगाव पालिकेला बांगड्यांचा आहेर देत महिलांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. दरम्यान, भर पावसाळ्यात पाणी टंचाई असूनही पालिका प्रशासन गेंड्याची कातडी ओढून झोपेचे सोंग घेत असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात येत होता.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या लोहार गल्ली परिसरातील महिलांनी माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढला. पालिकेत पोहोचल्यावर संतप्त महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात तब्बल एक तास ठिय्या मांडून होते. जोपर्यंत नगराध्यक्ष समोर येत आमच्या समस्या जाणून घेत नाही, तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतल्यामुळे अखेर नगराध्यक्षांना महिलांच्या समोर यावेच लागले. तत्पूर्वी सर्व संतप्त महिलांनी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या दालनात व न.पा. च्या आवारात हातातील बांगड्या बांगड्या फोडून आपला संताप व्यक्त केला.

धरणगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी व अंजनी नदी भरभरून वाहत असून सुध्दा मागील २३ दिवसापासून लोहार गल्ली परिसरातील पाणीपुरवठा खंडित होता. दरम्यान, आज पाणी आले. परंतू अवघा तास पाणी सुरु राहिले. त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट पालिकेवर धडक दिली. यावेळी महिलांनी पालिका कार्यालयात सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर, पाणी पुरवठा अधिकारी अनुराधा चव्हाण यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. संतप्त महिलांनी सुमारे २ तास पालिका सभागृहात सत्ताधारी तसेच न. पा. प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत घाम फोडला.

 

विशेष म्हणजे महिनाभरात धरणगाव नगरपालिकेवर पाणीप्रश्नी नागरिकांनी दुसऱ्यांदा मोर्चा काढलाय. तरी देखील गेंड्याची कातडी ओढून पालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. यावेळी किरण वऱ्हाडे, टोनी महाजन, विकास चौहान, हरीश माळी, दयाराम माळी, गोपाळ लोहार, हर्षल माळी यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी नगराध्यक्षांनी काही जबाबदारी वार्डच्या नगरसेवकाची पण असते म्हणून महिलांची समजूत घालून अंग झटकण्याचा प्रयत्न केला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

May 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या १५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव एन.बी. कॉटेक्सच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप !

September 4, 2022

अडावद परिसराच्या ग्राहकांच्या जोरावर पीपल्स बँक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची बँक होणार : अरुणभाई गुजराथी

February 23, 2021

हरिभाऊ जावळेंची बॅग धरणारे मला काय निष्ठा शिकवणार ; गिरीश महाजन यांची खडसेंवर कडवट टीका !

September 23, 2024

धरणगावात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !

December 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group