धरणगाव (प्रतिनिधी) बलिप्रतिपदा दिवसानिमित्ताने “महात्मा बळीराजा” प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.जळकेकर महाराज होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पी.एम.पाटील सर,अँड संजयभाऊ महाजन,पप्पू भाऊ भावे,जिजाबराव पाटील होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भाजप जिल्हाउपाध्यक्ष अँड.संजयभाऊ महाजन व शिवसेनेचे गटनेते पप्पू भाऊ भावे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
महात्मा बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष ह.भ.प जळकेकर महाराज व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनेते कैलास माळी सर यांनी केले तर प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले. आभार गोपाल पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील प्रगतशील शेतकरी देवालाल चव्हाण,संदीप पाटील,डिंगबर चौधरी,साहेबराव पाटील,मच्छिंद्र पाटील,रविंद्र महाजन,भास्कर मराठे,बालू पाटील,सुधाकर धनगर,वासुदेव हरिनाथ महाजन,एकनाथ पाटील,दिलीप पेंढारे,
वासुदेव गिरधर महाजन,बंधूंचा नारळ,रुमाल,टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते शिरीष बयास,भानुदास विसावे, कमलेश तिवारी,अँड.वसंतराव भोलाने,पुनीलाल महाजन,प्रकाश सोनवणे, दिनेश पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक कडूअप्पा बयास, ललित येवले, डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी धनराज सोनवणे, सदस्य चंदन पाटील, रावसाहेब सोनवणे,शाम पाटील, महेंद्र पवार, टोनी महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, सुनिल चौधरी, समाधान पाटील, आनंदा धनगर, पिंटू पाटील, रवींद्र मराठे, राजू महाजन, टोनी महाजन (प्रवीण), पापा वाघरे, अनिल पाटील, चंदन चौधरी, डॉ.वाल्मीक पाटील, विनोद पाटील, रवींद्र पाटील, सुधाकर सांळूखे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.