नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकच्या एका पोलिस चौकीत ओली पार्टी रंगली असल्याची व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या नागरिकांना मद्यपी पोलिसांनी मारहाण केली आहे. घटनास्थळी नागरिक जमत असल्याचे लक्षात आल्यानंतर मद्यपी पोलिसांनी तिथून पळ काढला आहे. ही घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी. के. नगर पोलीस चौकीत उघडकीस आली आहे.
आपल्या परिसरातील दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यासंबधी तक्रार देण्यासाठी परिसरातील नागरिक तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेले होते. तेथे मद्याच्या पार्टीत रंगलेले पोलीस त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी त्यांना जाब विचारला. मात्र पोलिसचं दारू पिताना आढळून आल्याने तक्रारदाराला धक्का बसला. तक्रारदाराने मोबाईल काढून शुटिंग सुरू करताच पोलिसांनी तक्रारदाराला मारहाण देखील केली आहे. सदर घटनेची परिसरात कुणकुण लागताच अनेक नागरिक डी. के. नगर पोलीस चौकी समोर जमा झाले होते.
धक्कादायक म्हणजे पार्टीत रंगलेल्या पोलिसांनी त्या नागरिकांनाच मारहाण सुरू केली. त्यामुळे नागरिकांचा मोठा जमाव पोलीस चौकी परिसरात जमयला सुरूवात झाली. पोलिसांच्या डर्टी पार्टीचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने. रात्री सव्वा दहाच्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस चौकीत भेट दिली. आणि नागरिकांना घडलेल्या प्रकरणाबाबत कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त नागरिक घरी परतले.