भुसावळ (प्रतिनिधी) खुशी विनोद बियाणी हिने नीट परीक्षेत 97.9 टक्के पर्सेटाईल गुण मिळवले . भारतातून पंधरा लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी बसले होते. त्या विद्यार्थ्यांमधून 26 हजार क्रमांकावर खुशी आली असून या यशाबद्दल तिचे भुसावळच्या बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, कांताबाई बियाणी, रोनक बियाणी, मनीष बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, प्रिन्सिपल डी.एम.पाटील, सुपरवायझर रूद्रा, आर.के.तायडे, एस.आर.पाटील, टी.आर.बाविस्कर, गोपाळ ठाकूर, राजीव पारीख, प्रवीण भराडीया यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.