TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : ना. गुलाबराव पाटील

चांदसर येथे स्वच्छतेचा जागर...शोषखड्डयाचा करू वापर मोहिमेस प्रारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपलीच सामूहिक जबाबदारी असून स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाश्रमदान कार्यक्रमातून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर या अभियानास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज तालुक्यातील चांदसर ग्रामपंचायतीत प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारीअभिजित राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

 

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाश्रमदान कार्यक्रमातून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर ! या अभियानास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत चांदसर, तालुका धरणगाव येथे सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे , सरपंच सचिन पवार यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, नागरीकांनी स्वच्छतेचे महत्व जाणल्यानेच आपण कोविडचा प्रादुर्भाव रोखू शकलो. जिल्ह्यात कोविड काळातही आरोग्यदूत, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले. महात्मा गांधीजींचा स्वच्छतेचा संकल्प प्रत्येक नागरीकांने यापुढील काळातही मनाशी करुन आपले घर आणि परिसर अधिकाधिक स्वच्छ राहील यासाठी स्वत:हून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही चांगल्या कामात लोकसहभाग असेल तर कामे अधिक दर्जेदार होऊन गावाची प्रगती होते. याचे उदाहरण म्हणजे चांदसर हे गाव असून याबद्दल त्यांनी गावकर्‍यांचे आणि सरपंच सचिन पवार यांचे तोंड भरून कौतुक केले. स्वच्छता ही निरंतर प्रक्रिया असल्याने प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हा आपले आद्य कर्तव्य समजावे. आपले घर व त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात. विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो. यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या मनोगतात आरोग्याची पंचसूत्री सांगून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच ई-पीक पाहणी, पीक पेरा व सातबारा याबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकर्‍यांना सात – बारा उताऱ्याचेही वाटपही करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर या अभियानाचे महत्त्व सांगितले. तसेच येत्या १०० दिवसात करावयाच्या कामांचे नियोजन सांगितले. स्वच्छता मोहिम ही लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. नंतर ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या अंगणवाडी सुशोभीकरण कामाची पाहणी केली.

 

सरपंच सचिन पवार यांचा असाही मानस

आपल्या मनोगतात सरपंच सचिन पवार यांनी जिल्ह्यातील पहिली वातानुकूलित अंगणवाडी सुरू करण्याचा मानस व्यक्त करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव आदर्श करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले. सूत्रसंचलन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक , तलाठी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

 

स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर ! अभियानाची वैशिष्टे

या अभियानामध्ये जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पुढील १०० दिवसात ५० शोषखड्डे तसेच मागणीप्रमाणे परवशि खताचे खड्डे याचे बांधकाम लोकसहभाग, १५ वा वित्त आयोग, मनेरेगा आशा विविध योजनांमधून करण्यात येणार आहेत. प्रति तालुका २५ घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्रामपंचायतस्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. तसेच १६ कलमी कार्यक्रमातर्ंगत प्रत्येक शाळा, अंगणवाडी यांना सुलभ शौचालय, वीज जोडणी, परसबाग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, डिजिटल शिक्षण आदि बाबीचा समावेश असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी ; शिवसेनेला मोठा झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

November 8, 2020

चाळीसगावात नवीन रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर ; शहरवासियांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दिवाळी भेट !

November 11, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ नोव्हेंबर २०२३ !

November 5, 2023

गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

October 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group