TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सध्या कमी पाऊस असल्याने सरपंचांसह शेतकर्‍यांनी केलेल्या मागणीची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर गिरणा नदीच्या पात्रातून पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधार्‍यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून यामुळे नागरिकांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

याबाबत वृत्त असे की, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात चांगला पाणीसाठा होता. यंदा ऑगस्ट महिना संपण्यात आला असला तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के इतका जलसाठा आहे. दरम्यान, धरणाच्या खालील भागातील बंधार्‍यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते. यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधार्‍यांना लागून असणार्‍या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते. यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह नागरिक चिंताक्रांत झालेले आहेत. यामुळे विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना गिरणा बंधार्‍यांच्या कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी साकडे घातले होते. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र कुमार बेहरे यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव या बंधार्‍यांमधून कालव्यांमध्ये काल पाणी सोडण्यात आले आहे.

READ ALSO

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

यातील जामदा बंधार्‍यातील पाण्यामुळे बहाळ, कोळगाव, भडगाव व आमडदेसह परिसराला लाभ होणार आहे. तर दहीगाव बंधार्‍यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने दापोरा, खेडी, रिंगणगाव, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, पथराड, फुलपाट, झुरखेडा, दोनगाव, चांदसर, पिंपळगाव, वराड, हिंगोणा आणि पिंप्रीसह अमळनेर तालुक्यातील पातोंडा, जळोद, कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने दखल घेऊन कालव्यांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आता पिके शेवटची घटका मोजतांना दिसत आहेत. दरम्यान, पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे या करीता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडं घातलं जात होते. आज सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे छोट्या नाल्या-ओढ्यात पाणी वाहून विहिरी, बोरिंगच्या पाण्याची पातळी वाढेल. धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील ७० ते ८० गावांना फायदा होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

चावलखेडा येथे भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 10, 2022

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात

July 20, 2021

उद्धव ठाकरे म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता

November 5, 2022

हर घर तिरंगा, प्रत्येक वीजबिलावर तिरंगा !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group