धरणगाव (प्रतिनिधी) बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना तालुक्यातील पिंप्री येथे 15 ते 17 जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश सीताराम बडगुजर (63, पिंप्री खुर्द) हे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. 15 ते 17 दरम्यान ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे कर्णफुल, पाच हजार रुपये किंमतीच्या साड्या व 18 हजारांची रोकड असा एकूण 55 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बडगुजर यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजू पाटील करीत आहेत.