मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. कडू यांनीच याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे.
राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी’, असे आवाहन ट्विटद्वारे कडू यांनी केले आहे. दरम्यान, कालच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला होता.
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 19, 2020