जळगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना ‘गुलाबभू, शिवसेनानी गढी बन व्हयनी !’ या आशयाचे खास अहिराणी भाषेत लिहिलेले पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर जळगाव शिवसेना जळगाव कार्यालयात कार्यक्रम झाल्यामुळे पत्रकार तिवारी यांनी ‘बाबारे बाबा, शिवसेना गढी उघडनी….’ अशी अहिराणी भाषेतीलच पोस्ट टाकून पुन्हा धमाल उडवून दिली आहे.
गोलानी मार्केटमा शिवसेनानी गढी शे. आज या गढीन दार उघाड. शिवसेनाना कारभारी यकनाथराव शिंदे अन खासदार शिरीकांत शिंदे यास्नाकडून जयगाव शिवसेनाले भेटेल आजारी मानूसले लैजावाना गाडीना चाब्या देवाना कारेक्रम आज झाया. या कारेक्रम गुन्ता पायकमंतरी गुलाबभू गढीना जोडे येयल व्हता. आमदारा चंदरकांतभू, जिल्हाना कारभारी गुलाबभू वाघ, शहर परमुख शरभू, गजूभू आदी तठे येयल व्हतात.
शिवसेना गढीना दार बंद व्हत. शिपाई गणेशले सऊ महिना झाया पगार भेटेल नइ अस सांगामा येत व्हत. पन आज गणेशले इचार त म्हने माले पैसा भेटी रायानात. शरदभूकडून पगार भेटी जास. कोराना लाकडाऊन मां गढी बंदच व्हती. मी आजारी व्हातू म्हनीसन गढी बंद व्हती अस त्यानी सांग. ‘जाऊ दे गडा आपले काय करान ? गढीना माणूसले पैसा भेटी रायानात अन् गढीना दारे उघडी रायनात हाई कमी शे का ?’ शरदभूनी सांग, ‘मीच गढी मां ध्यान घालस. तठे आमना नगरसेवक बठीसन लोकेस्ले भेटतस. माणूस आजारी व्हता म्हनीसन गढी बंद व्हती. आते चालू शे.’
जय महारास्ट्र
जय उद्धवभू
जय शिवसेना !!!