जयपूर (वृत्तसंस्था) एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या भाच्यासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. एवढेच नव्हे तर सात जणांच्या टोळक्याने अत्याचाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर देखील व्हायरल केला.
अलवर जिल्ह्यातील तिजारा येथे १४ तारखेला पिडीत महिला आपल्या माहेरी भावाला पैसे देण्यासाठी गेली होती. आपल्या भाच्यासोबत दुचाकीवरून आपल्या माहेरहून परतत येत असतांना सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्यांना शस्त्रांचा धाक दाखवला. त्यानंतर भाच्याला बांधून ठेवत त्यातील काही तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार इतर साथीदारांनी मोबाइल कॅमेऱ्यात शूट केला. एवढेच नव्हे तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पिडीत महिलेने १७ तारखेला पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.