भुसावळ (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील खडका चौफुलीवर एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना दि. १३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. अलतमश शेख. रशीद (वय १९, रा. अंजुमन शाळेजवळ, भुसावळ), असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
शहरातील महामार्गावरील खडका चौफुलीवर सुरु असलेल्या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या पुलाच्या बोगद्यात अज्ञातांनी अलतमश शेख. रशीद (वय १९, रा. अंजुमन शाळेजवळ, भुसावळ) याचा जुन्या वादातून खुन झाल्याची घटना दि. १३ रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या वाजेच्या सुमारस घडली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी अलतमशला जखमी अवस्थेत मोटरसायकरुन डॉ. राजेश मानवतकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी आणले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळींची गर्दी झाल्याने काही विपरीत घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आरसीपी पथकाचा बंदोबस्त दवाखान्यातच्या आजूबाजूला लावला होता.
अज्ञात हल्लेखोरांनी अलतमश याच्यावर कोणत्या कारणावरुन हल्ला केला याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सपोनि मंगेश गोटले, सपोनि अनिल मोरे, डिबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अज्ञात हल्लेखोरांनी अलतमशचा खून केल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाले.
भुसावळ शहरात १९ दिवसात खुनाची दुसरी घटना घडली आहे. याआधी दि, २५ ऑगस्ट रोजी श्रीराम नगरातील रहिवासी विलास दिनकर चौधरी याच्यावर घरात घुसून चाकू व गोळीबार करुन हत्या केल्याची घटना बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती दि. १३ रोजी खडका चौफुलीवर घडली आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तपास डिवायएसपी गजानन राठोड, प्रभारी पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.