नवी मुंबई (वृत्तसंस्था) सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. याचबरोबर, सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. तसेच महाराष्ट्रावर काही डोमकावळे चोची मारत आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्ही ( माथाडी) व शिवसैनिक समर्थ आहेत. मुंबईतील मराठी माणसाचे स्थान टिकविण्यासाठी काम करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न पूर्ण करूया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.