TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल ; पवार साहेबांच्या भेटीनंतर योगेश देसले भारावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत जात विठ्ठलाचं दर्शन घेतात. पण माझा विठ्ठल मला घरी येऊन दर्शन देईल, याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण हे खरंय की, भर धगधगत्या उन्हात माझ्या विठ्ठलाने घरी येऊन मला दर्शन दिलंय. शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढं माझं मन दाटून आलंय. माझ्या परिवाराने दिवाळी आधीच दिवाळी साजरी केली हो !, असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांना भावना अनावर झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कौटुंबिक भेटीनंतर ते ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यात त्यांनी म्हटले की, मुंबईत माझी साहेबांशी कामानिमित्ताने केव्हाही भेट झाली की, साहेब आपुलकीने विचारपुस करायचे. मी ही अनेकवेळा साहेबांना जळगाव दौऱ्यात घरी येण्याची विनंती करायचो. आलो की तुझ्या घरी नक्की येईल म्हणत साहेब हसत हसत मला शब्द द्यायचे. साहेब शब्द देतात म्हणजे पाळतातच. त्यानुसार साहेबांनी दिलेला शब्द खरा केला आणि माझ्या घराला पाय लावून मला भाग्यवंत केलं.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अमळनेर येथे ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय अधिवेशनसाठी साहेब १६ जून ला जिल्हा दौऱ्यावर असल्याचा दौरा कार्यक्रम प्रशासनाला आला देखील होता. त्यात साहेबांच्या वेळा पाहून मलाही वाटलं आपण एकदा परत आग्रह करावा. त्यामुळे मी साहेबांना व्हाट्सएपच्या माध्यमातून दोन ओळीचा मॅसेज टाकला. थोड्याच वेळात मला साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला आणि मी थोडा स्तब्ध झालो. खरं म्हणजे माझा विश्वास बसला नाही मात्र, साहेबांचे पीएस सतीश राऊत हे माझ्याशी बोलत होते. राऊत साहेब म्हणाले साहेबांनी मला आपल्याशी बोलायला सांगितलं आहे. तुम्ही साहेबांना घरी भेट देण्यासाठी विनंती केलीय का? मी म्हणालो हो..! आणि त्यांनी फोन ठेवला.

थोड्या वेळाने परत राऊत साहेबांचा फोन आला आणि मला म्हटले साहेब येणार आहेत, तुमच्याकडे. दुपारी साडेतीनची वेळ दिली आहे. तुमचा घराचा पत्ता सांगा ! सुधारित दौरा झाला की तुम्हाला पाठवतो म्हणून सांगितले. ठरल्याप्रमाणे साहेब अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून भर उन्हात माझ्या निवासस्थानी दिलेल्या वेळात दाखल झाले. जिल्ह्याच्या तापमानाच्या दृष्टीने पाहिलं तर साहेबांच्या चेहऱ्यावर प्रचंड ऊर्जा होती. साहेब घरी आले. माझ्या कुटुंबियांशी दिलखुलास गप्पा केल्यात. माझे मोठे मामा कै. शांताराम पवार यांचे निधन झाल्याने माझे तिन्ही मामा माझ्याकडे आलेले होते. साहेबांनी त्यांचेही सांत्वन केले.

माझ्या आईचे वडील स्वातंत्र्य सैनिक स्व.नामदेवराव पवार हे काँग्रेसचे कट्टर पुढारी होते.आणि १९९३ साली साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या आजोबांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान पत्र मिळाले होते. तेव्हा पहिल्यांदा साहेबांना मुंबईत जवळून पाहिलं होतं. त्यावेळी माझं वय अवघे १२ वर्ष होत. त्याकाळीच काय तर कधी मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं की, आज माझ्या आयुष्यातील हा प्रसंग येईल आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून साहेब माझ्या घरी येतील. साहेबांनी मला दिलेला शब्द खरा केला हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मी सन्मानच समजतो. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल या आशयाचा भावनिक व्हिडीओ देखील योगेश देसले यांनी सोशल मीडियात शेअर केला आहे.

दरम्यान, अमळनेर येथून दुपारी २.३० वाजता‎ शरद पवार हे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या आहुजानगरातील निवासस्थानी आले होते. यावेळी आमदार एकनाथराव खडसे, अरुणभाई गुजराथी,‎ जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्यासह‎ पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

हरभरा खरेदीत २९ शेतकऱ्यांची साडेतीस लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! आता अजून एक आधार कार्ड ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती

April 18, 2022

रासी सीडस कंपनीतर्फे मका-३४९९ खरेदीवर सायकल गिफ्ट

June 14, 2021

‘या’ कंपनीकडून सरकारने 100 कोटी रुपये ढापले – सोमय्यांचा गंभीर आरोप

November 26, 2020

ब्रेकिंग न्यूज : संगमनेर कारागृहातून पळालेल्या कैद्यांना जळगाव जिल्ह्यातून केली अटक !

November 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group