मुंबई (वृत्तसंस्था) ईडीचं पथक दाखल झाल्यानंतर तरीही शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. तसेच खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असे एकामागून एक ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. त्यानंतर तासाभरानंतर संजय राऊत यांनी तीन ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून ट्विट करून म्हणालेत, खोटी कारवाई.., खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, तरीही शिवसेना सोडणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. संजय राऊत पुढे म्हणतात, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.
बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन,असे ते म्हणाले आहेत. ज्यावेळी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यांनी मला केंद्रीय यंत्रणेकडून चुकीच्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. मी कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही मी माझी लढाई लढेन असंही त्यांनी सांगितले आहे. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असेही राऊत यांनी म्हटले आहे.