जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पंचायत समित्यांची पुढील काही महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आज पं.स. सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
पारोळा : अनुसुचित जाती महिला,
भुसावळ आणि बोदवड : अनुसुचीत जमाती
चोपडा : अनुसुचित जमाती महिला
जळगाव आणि एरंडोल : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
धरणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
रावेर, भडगाव, मुक्ताईनगर आणि चाळीसगाव : सर्वसाधारण महिला
अमळनेर, जामनेर, पाचोरा आणि यावल : सर्वसाधारण प्रवर्ग
अनुसूचित जाती महिला- १; अनुसुचीत जमाती-२ व अनुसुचीत जमाती महिला – १; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह)-१; नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला ( विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसह) -२ अशा प्रकारे सात पंचायत समिती सभापतीपदे राखीव आहेत. उर्वरित पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्ग-४ आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिला – ४ असे आरक्षण निघाले आहे.