मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचं स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती, अभिनेता विकी कौशल या जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशलला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं सावधगिरी बाळगत या जोडीनं सांताक्रुझ पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध पोलिसांनी घेत असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे सलमान आणि त्याच्या वडिलांनाही मिळालेली धमकी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ज्यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.