TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या व्यासपीठाचा फायदा घ्यावा ; खा.उन्मेष पाटील यांचे आवाहन

नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना क्रीडा साहित्य वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नशिबाने केवळ एक टक्का युवक यशस्वी होऊ शकतो तर ९९ टक्के युवक प्रयत्नांनी यशस्वी होतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे नशीबाच्या विचारात अडकून आपण स्वतःची फसवणूक करू नका. युवकांनो आपले ध्येय निश्चित करावे जो खेलेगा वही खीलेगा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवा. येत्या काळात कोरोना संपला की युवकांसाठी दोन दिवसीय नेहरू युवा केंद्राचे शिबीर आयोजित करू. जळगावचे केंद्र देशात सर्वोत्तम ठरेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्वांना आपल्या शालेय जीवनात चांगले व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला नेहरू युवा केंद्राचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्याचा चांगला फायदा करून घ्या असे आवाहन खा.उन्मेष पाटील यांनी केले.

 

READ ALSO

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज रविवारी जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवतीर्थ मैदान येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजपा जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पाहुण्यांचा परिचय भूषण लाडवंजारी यांनी करून दिला. प्रस्तावना करताना नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी सांगितले की, सध्या फिट इंडिया उपक्रम देशभर राबविला जात आहे. तुम्ही फिट राहणार तर मन फिट राहील. आपण स्वतः फिट रहा इतरांना प्रोत्साहित करा. नेहरू युवा केंद्र हा केंद्र शासनाचा उपक्रम असून तरुणांना घडविण्यासाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात अशी माहिती देऊन त्यांनी प्रोजेक्टरवर काही स्लाइड्सच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती नरेंद्र डागर यांनी दिली.

 

युवकांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवत शरीर तंदरूस्त ठेवावे : आ.भोळे

प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की, आपण निसर्गाशी खेळलो म्हणून आज निसर्ग आपल्याशी खेळतो आहे. अगोदर मनुष्य प्लास्टिक बाहेर फेकायचा आता मनुष्याला प्लास्टिकमध्ये जाळावे लागत आहे. नेहरू युवा केंद्र व केंद्र सरकार आणि तरुणांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. आपण समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून कार्य करा. प्रत्येकाने रोज शरीरासाठी तासभर वेळ द्यावा. घरी किंवा बाहेर जाऊन व्यायाम करा. ग्रामीण खेळ रांगडी खेळ होते. ते आज लुप्त होत चालले होते परंतु त्यापैकी काही खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जिवंत केले. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे आणि स्वतःला तंदरूस्त ठेवावे, असे आवाहन आ.भोळे यांनी केले. तसेच सर्वप्रथम आपण जिंकायचं कुणाशी हे ओळखायला शिकावे. जर ते लक्षात आले तर आपल्याला आयुष्यात यश नक्की मिळेल. देश आपली आई आहे त्यामुळे आपल्या आईसाठी काही चांगले काम करताना कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा असे आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले.

 

गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी सांगितले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण विकास साधला जातो. नेतृत्व करीत एकमेकांना साहाय्य करायचे. ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारचा इतका मोठा उपक्रम असेल तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एखादा मोठा कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करावी, अशी अपेक्षा गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी व्यक्त केली.

 

विनोद ढगे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात एक सामाजिक चळवळ उभारण्याचे काम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळात देखील स्वयंसेवकांनी जनजागृती करण्याचे काम मोठ्याप्रमाणात केली. तरुणांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहावे या उद्देशाने नेहमी विविध उपक्रम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्घाटन खा.उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा युवा शब्द येतो तेव्हा तो आपला शब्द वाटतो. युवा शब्दाने एक वेगळी प्रेरणा मिळते. एका बाजूला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान घेतांना आपण आव्हान देखील स्वीकारायला हवे. देश खऱ्या अर्थाने जगात पुढे जाणार असेल तर तो युवकांच्या बळावर जाईल त्यामुळे आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. नेहरू युवा केंद्रासोबत काम करताना आपण स्वतः उत्स्फूर्त असायला हवे. शेकडो तरुणांना नेतृत्त्व, प्रेरणा देणारे आपण विविध संस्थांचे प्रतिनिधी आहोत. आपण आपल्या आणि युवकांच्या विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करा. घरात बसून स्वप्न पूर्ण होत नाही, सहभाग घ्या, ध्येय निश्चित करा. आपण जबाबदारी घ्यायला हवी, दोन पाऊले पुढे जायला हवे. आपण मनाने तरुण असायला हवे जर मनाने थकलेले असाल तर काहीही साध्य होऊ शकत नाही, असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले.

 

३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यात बुद्धिबळ पट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, नेट, बॅटमिंटन रॅकेट, शटल कॉक यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, हितेश ओत्सवाल, शिवदास कोचुरे, दीपक सपकाळे, प्रशांत बाविस्कर, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
जळगाव

पाळधी गावात ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

June 25, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 जून 2025

June 25, 2025
जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2025

June 24, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
Next Post

जळगाव गँगवार : आणखी एका आरोपीला अटक ; दोघांचा शोध सुरूच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करा : अॅड. जमील देशपांडे

January 15, 2022

भव्य मूक मोर्चा काढत अन्नत्याग सत्याग्रहाला समाज बांधवांनी दिला पाठिंबा !

August 15, 2023

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी

December 13, 2020

तुषार चौधरी खून प्रकरणाचा अमळनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासात उलगडा !

December 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group