नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तीन नराधमांनी मुलीचं अपहर करून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली होती. परंतू मृत्यूनंतरही अल्पवयीन मुलीवर नराधम बलात्कार करत होते, अशी धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.
गेल्या २३ डिसेंबरला राजस्थानमधील बुंदी येथील १५ वर्षीय मुलगी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती. त्यावेळी एका आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी मिळून मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यावेळी पिडीत मुलीने प्रतिकार केला असता तिची दुपट्ट्याने गळा आवळला. एवढेच नव्हे तर, दगडाने तिचं डोक ठेचून हत्या केली.
मुलगी घरी आली नसल्यानं कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जंगलात विविस्त्र अवस्थेत आढळून आला. यावेळी तिच्या मानेवर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने बलात्काराची कबुली दिली. तसेच मित्रांसोबत मिळून हे कृत्य केल्यांचं पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पिडीत तरुणीच्या शवविच्छेदन अहवालावरून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.