जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर तरुणाने प्रेमप्रकरणातून अत्याचार केला. या प्रकाराचे छायाचित्र काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत तरुणाच्या मित्रानेही काही दिवसांनी त्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस दिलीप सोनवणे (वय-20) व चेतन पितांबर सोनार (वय-20) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी तेजस सोनवणे हा एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्याचा मुलगा असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच दोघेही संशयित फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. फोटोची धमकी देवून पुन्हा दोघेही शरीर संबंध ठेवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून दबाव टाकत होते. हा प्रकार सर्व असह्य झाल्याने पीडित मुलीने आपबिती आईवडीलांना सांगितली यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखलची कुणकुण लागताच दोघे फरार असून त्यांच्या शोधार्थ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षका भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सुचनेनुसार पोहकॉ दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, रविंद्र पवार, महिला पोलीस नाईक अभिलाषा मोरे, धनंजय येवले, राहुल पाटील यांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.