रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कर्जोद गावामध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गावातील आणखी काही लोकांना ताप थंडी तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत.
कर्जोद येथील एक आठ वर्षीय बालकाला गेल्या दोन दिवसांपासून थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसू लागल्याने त्यास रावेर येथील खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले. पुढील तपासण्या केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याचे परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील रुग्णांना अंगावरील खाज खूजली फुपस्या तसेच आणखी काही रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डेंग्यू चा हा आजार डासांमार्फत होत असून गावात बहुत्येक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आरोग्य विभागाने गावात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
















