जळगाव : (शिवराम पाटील) धरणगाव आणि जळगाव जिल्ह्यातील वाळू व्यवसायाने अक्राळ स्वरूप धारण केले. मक्तेदारी कमी आणि चोरी जास्त ! ज्याला जमेल त्याने रेती चोरी करणे, आधिकाऱ्यांना हप्ते देणे इतके अति झाले की, येथील महसूल प्रशासन हेच रेतीचोरीत सामील झाले. महसूलमंत्री कांग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणून त्यांच्यावर थोडेफार तरी गांधी-नेहरूंचे संस्कार असतीलच, अशी अपेक्षा ठेवून जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील आणि सचिव डॉ सरोज पाटील, आण्णा हजारे यांचे कार्यकर्ते सोबत घेऊन महसूलमंत्रींची भेट घेण्यासाठी संगमनेर गाठले. कुणी तरी म्हणे साहेब दौऱ्यावर आहेत. निवेदन ठेवून जा, सोपवू त्यांना. खेमणर आणि गांगुर्डे नावाचे पीए भेटलेत. म्हणाले…करू फोन. पण सहा महिन्यात एकही फोन नाही, मेसेज नाही.
रेतीमाफिया आणि आधिकारी यांनी संगंमताने रेतीची लुटमार चालू केली. तहसीलदारकडे केंव्हाही गेले तरी दोन चार रेतीमाफिया बसलेले. आम्हाला शिपाई सांगतो, महत्त्वाची मिटींग चालू आहे. तुम्ही उद्या या. तहसील कार्यालय हेच रेतीमाफियांचे कार्यालय बनलेले आहे. इतर निर्धारित कामे प्रलंबित आहेत. या आम्ही दाखवतो. म्हणून जळगाव तालुक्याला तहसीलदार पद नाहीच असे समजून आम्ही वागत आहोत.यात कोणीही वाद घातला तर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप होईल या भीतीने तहसीलमध्ये जात नाही. तहसील तथा रेतीमाफियांचे संपर्क कार्यालय,असे बोर्डाचे फलक अनावरण करायचे आहे. माननिय महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे हस्ते!
महसूल प्रशासनाची संपूर्ण कार्यप्रणाली बिघडलेली आहे.आरटीआय व सामाजिक कार्यकर्ते यांचा समज आहे की आपण जिल्हा पातळीवर तक्रार केली तर यांचेवर वचक बसेल. म्हणून ते येथेच तक्रारी करून पोलीस, कोर्टाच्या जंजाळात अडकतात. नाही काही सापडले तर महिला आमदार, महिला आधिकारी यांच्या अब्रूचा वापर भ्रष्टाचार लपवण्यासाठी ढाल बनवतात. आणि ही सुरुवात आमच्या जळगाव जिल्ह्यातून सुरु झाली आहे. भ्रष्टाचार आणि अब्रूचा लिलाव यात जळगावने आघाडी घेतली आहे. आमची खात्री आहे कि या महसूल आणि रेतीचा माफियांच्या नातेसंबधात फक्त तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी ,कलेक्टर जबाबदार नसून याची सूत्रे संगमनेर मुख्यालयातून हलवली जात आहेत.
महसूलमंत्री कांग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणून त्यांच्यावर थोडेफार तरी गांधी नेहरूंचा संस्कार असेलच. अशी अपेक्षा ठेवून जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील आणि सचिव डॉ सरोज पाटील, आण्णा हजारे यांचे कार्यकर्ते सोबत घेऊन महसूलमंत्रींची भेट घेण्यासाठी संगमनेर गाठले. जळगाव जिल्हा जागृत जनमंचने संगमनेरचे यशोधन गाठले. म्हणे साहेब दौऱ्यावर आहेत. निवेदन ठेवून जा. सोपवू त्यांना. खेमणर आणि गांगुर्डे नावाचे पीए भेटलेत.म्हणाले, करू फोन. पण सहा महिन्यात एकही फोन नाही, मेसेज नाही. असा लपवाछपवीचा अनुभव आला.
जळगाव जिल्ह्यातील महसूल मधील रेतीचोरांचा धंदा टोकाला पोहचला. तहसीलदार आणि रेतीचोर यातील फरक उरला नाही. काही नोकरांनी तर स्वतः ट्रैक्टर ,डंपर घेऊन सहभाग नोंदवला. म्हणून दिपक गुप्ता यांनी रेती चोरी आणि हप्तेखोरीच्या तक्रारी कलेक्टर साहेबांकडे केल्या. पण काहीच उपयोग नाही. उलट त्यांचेवरच खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी आता अब्रूची ढाल वापरली गेली. महसूल आधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी ओलांडली. नैतिक पातळी सोडली. भ्रष्टाचार लपवण्यासाठी स्वताहून अब्रूचे लक्तरे वेशीवर टांगलीत. जेथे महिला आपल्या न्यायाची दाद मागणार तेथेच कौरवसभा चालू झाली. जर द्रौपदीची अब्रू हस्तिनापूरमध्ये चर्चेत आली तर इतर महिलांनी तरी द्रौपदीकडे कसा न्याय मागावा? अभिवचन, प्रतिज्ञापत्र, न्यायनिवाडावर कसा विश्वास ठेवावा? अभिलेख, हस्तांतरण, फेरफार दस्तावेज येथे सुरक्षित कसे राहातील? भुसावळ तहसीलमधून शिंदी येथील शेतजमीनीचे २०१३ चे कार्यालय विवरण गायब झाल्याची तक्रार दिपक गुप्ता यांनी कलेक्टर,आयुक्त, पोलीस स्टेशनला केली. म्हणे चौकशी चालू आहे. कशाची चौकशी? सांगा,तुम्ही किती घेतले? कोणाला किती दिले? मला किती देणार? थोरातांना किती देणार?
खरं म्हणजे पदाचा गैरवापर करून तहसीलदाराने किती कमवले?कार्यालयीन विवरणपत्र गायब केले, ते कोणी लिहीले होते? कोणाचे हित होते? कोणी चोरी केली? फक्त हेच का चोरले असेल चोराने? याची उत्तरे तर तयार आहेत. तरीही याची उत्तरे युपीएससी उत्तीर्ण कलेक्टर, आयुक्त यांनी अजून शोधली नाहीत.आणि हेच ते महसूल आधिकारी जिल्ह्यात प्रशासन चालवू पाहात आहे. म्हणे.. जनतेने महसूल प्रशासनाला सहकार्य करा. कसे शक्य आहे? जनतेने तरी अशा आधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा? दिपक गुप्ता आणि इतर नागरिकांना वाटते यावर अंकुश ठेवू. शक्य नाही. यावर अंकूश आहे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा. सद्या तरी ही सूत्रे तेच हलवत आहेत, संगमनेरहून.
याबाबत शिवराम पाटील यांनी महसूलमंत्री थोरातसाहेबांना लिहीले. खरमरीत लिहीले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जळगावला हाजीर हो ! कांग्रेस पतनाचा शोध आणि बोध! कांग्रेस नामक जहाजको भ्रष्टाचारका भोक ! हे लेख संगमनेर तालुक्यात पसरून महसूलमंत्री पर्यंत पोहचले. आग लागलीच असेल. पण हिंमत झाली नाही, फोन करून आक्षेप घेण्याची.नैतिक धाडस झालेच नाही.
म्हणून कांग्रेसचे पदाधिकारी,उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी स.का.पाटील यांच्या माध्यमातून भेट मागितली. आधी १३ सप्टेंबर नंतर २० सप्टेंबर तारीख ठरली. शिवराम पाटील, डॉ सरोज पाटील, ईश्वर मोरे,राकेश वाघ अशा चार लोकांनी सरळ संगमनेर गाठले. चार वाजता संगमनेर पोहचले.आणि थोरातसाहेबांनी सुयोधन सोडले.राजहंस गाठले.यांनी पाठलाग केला तर साहेब गायब. म्हणे जळगावची माणसे काय बोलतील? येथले लोक काय ऐकतील? शिवराम पाटील तर अमळनेरी साथी गुलाबराव पाटलांची भाषा बोलतात. म्हणून सरळ पळ काढला. मी पसार होईपर्यंत यांना खिळवून ठेवा, अडवून ठेवा. मी कुठे आहे, हे कोणीच सांगायचे नाही. असाच आदेश होता साहेबांचा. जास्त विचारले तर सांगा, साहेब मुंबईला गेले. तरीही यांनी मुंबई वाटेवर पाठलाग करायचे ठरवले. पण लोकेशन सांगीतलेच नाही. शिवराम पाटलांनी फोनवर बोलण्याचा आग्रह केला तर म्हणे साहेब फोनवर बोलत नाहीत. मग कुठे कुठे बालतात? शेवटी कसेबसे पीए निर्मळ यांचेशी फोन कनेक्ट झाला. त्यांना आणि साहेबांना रेतीची अ ब क ड माहिती नाही, असा आव आणला. शिवराम पाटील यांनी संपूर्ण माहिती फोनवर सांगितली जी २६ ऑगस्ट २०२० ला कलेक्टर मार्फत पत्र पाठवले. १७ सप्टेंबर २०२० ला ई मेल ने पत्र पाठवले. चार वेळा व्हाटसअपवर पाठवले. ते सर्व जाणून होते.
बाळासाहेब थोरात मंत्री बनूनही नावासारखे बाळबोध वागले. पळ काढला तर हे लचांट लागणार नाही. या पापातून कोणी सुटले का, बाळासाहेब? शिवराम पाटील यांचा आवाज म्हणजे हेडमास्तरचा आवाज. थोरातांचे पीए श्री निर्मळ यांच्याशी बोलताना डॉ.सरोज पाटील आणि राकेश वाघ यांनी सहज व्हिडीओ घेतली. आठवण म्हणून. तर तेथील सर्व चेल्या चपाट्यांनी आक्षेप घेतला. डिलीट करायला लावले. ते थोरात किंवा अन्य पीएचे चित्रण नव्हते, तरीसुद्धा. म्हणे यामुळेच आमच्या सुयोधनची बातमी बाहेर जाईल. रेतीचा धंदा उजागर होईल. संगमनेर आणि महाराष्ट्रात छी थू होईल. का भीती वाटत बाळगावी? ते जनतेचे आमदार आहेत. जनतेच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. तरीही जनतेची भीती का? खरेच गरज आहे का,हे धंदे करण्याची?
जळगावचे नादान नागरिक तलाठी,तहसीलदार,प्रांताधिकारी यांची तक्रार करतात. कलेक्टर चौकशीच्या नावाने दोनचार वर्षे सहज मुर्ख बनवतात. नागरिक नाशिक महसूल आयुक्ताला तक्रार करतात. तसेच दिपक गुप्तांनी कलेक्टरला तक्रार केली. काहीच कारवाई नाही. पुढे नाशिक आयुक्त राधाकृष्ण गमेंना जळगाव मुक्कामी भेटून ९सप्टेंबर ला तक्रार दिली. पण कारवाई शुन्य ! हे आयुक्त पद मंत्रीसाठी वसुली करण्यासाठी काम करते. कोणी महसूल आधिकारी विरोधात अशी तक्रार केली तर दोषीला तीस चाळीस लाखात ओरबाळले की, झाली कारवाई. याला प्रशासकीय भाषेत क्षमापन म्हणतात. सहा दिवस चोरी करा. रविवारी फादरला शेयर करा. सर्व गुन्हे माफ. तसेच हे आयुक्तपद. म्हणजे एकंदरीत आम्ही तक्रारकर्ते आयुक्त आणि महसूलमंत्रीचा आर्थिक फायदा करून देत असतो. यासाठीच तर रूसवाफुगवा केला होता थोरातांनी,मलाईदार खात्यासाठी.
जळगाव जिल्ह्यातील रेतीकनेक्शन संगमनेरला पोहचते. यासाठी तलाठी,तहसीलदार, प्रांताधिकारी यांना आपली अब्रू सुद्धा गमवावी लागते. पैसा,प्रमोशन आणि पोस्टींग साठी. तरीही आम्ही यांना लोकसेवक म्हणून आदराने नमस्कार करतो. मंत्र्यांना माननीय, सन्माननिय,नामदार बिरूद लावतो. हे किती चूक किती बरोबर याचा तर्कसंगत विचार नागरिकांनी करायचा आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जळगाव जिल्हा जागृत जनमंच आवाहन करीत आहे कि,थोडे जरी नैतिक साहस असेल तर जळगावला यावे.आम्ही आपल्याशी मैदानात, जनतेसमोर, कॅमेरामोर तुमचे पाप तुमच्या झोळीत टाकणार आहोत. आणि जर इतकेही नैतिक साहस नसेल तर सरळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मंत्री पद नसले तरी तुम्हाला उदरनिर्वाहासाठी आर्थिक चणचण भासणार नाही. पण महाराष्ट्र राज्याचे महसूल प्रशासन नासवू नका. नद्या नाले खरडू नका. महिला आधिकाऱ्यांना द्रौपदी सारखे द्यूतवर लावू नका आणि कांग्रेसची उरली सुरली अब्रू घालवू नका.
थोरातसाहेब तुम्ही प्रामाणिक आहात आणि आम्ही खोटे आहोत,हे सिद्ध करण्याचा विडा उचला. शासन आणि प्रशासनही निरंतर चालणारी यंत्रणा आहे.आमच्या नंतर आमच्या तुमच्या पिढ्या चालवतीलच. फक्त तुम्ही नासवू नका. ही हात जोडून विनंती !
जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्या व्हाटसअपवरून साभार
(मो. ९२७०९६३१२२)
(लेखक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत.