चोपडा (प्रतिनिधी) नवीन रोटरी सदस्यांसाठी ‘घराघरात रोटरी पोहोचवायची आहे, मनामनात रोटरी रुजवायची आहे’, या विचारांच्या ध्यास घेऊन रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सभासदांसाठी रोटरी क्लबच्या कार्यविस्तार आणि उद्देश पूर्तीसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.प्रदीप जोशी उपस्थित होते.
नवीन सभासदांसाठी रोटरी ची नियमावली, सेवा संस्कार व रोटरीचे विविध क्षेत्रात असणारे सेवाभावी कार्य या विषयी डॉक्टर प्रदीप जोशी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर उपस्थित होते. मित्रता, नेटवर्किंग, नैतिकता आणि सेवा या रोटरीच्या मूल्यांवर आधारित आपल्या खुमासदार शैलीत माननीय शब्बीर शाकीर यांनी आपल्या मनोगताने सर्व रोटरी बांधवांची मने जिंकली.
सदर कार्यशाळेत रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव चे राहुल कुलकर्णी, पी डी जी राजे संग्राम सिंह भोसले तसेच सह – प्रांतपाल योगेश भोळे, संकेत छाजेड, धर्मेंद्र मेंडकी,पूनम गुजराती उपस्थित होते सोबतच कार्यशाळेचे मुख्य आयोजक रोटरी क्लब चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव व सहआयोजक रोटरी क्लब अमळनेर अध्यक्ष अभिजीत भांडारकर, चाळीसगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी.चे अध्यक्ष संदीप जोशी तर रोटरी क्लब ऑफ चोपडा,अमळनेर,चाळीसगाव,भुसावळ चे रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. चोपडा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट नितीन अहिरराव यांनी प्रास्ताविक तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.आशा वाघजाळे यांनी करून दिला तर सचिव रुपेश पाटील यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव महाले यांनी केले.