मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील मन्नत हा बंगला अनधिकृत असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
शाहरुखचा मन्नत हा असलेला बंगला सरकारच्या जमीनवर आहे, ही जमीन बेकायदा घेतली आहे . सरकार कोणाचेही असो शाहरूख ला पाठीशी घालत आहे. त्याच्याकडून टॅक्स घेतला जात नाही. शाहरूख खान अनधिकृत आणि बेकायदेशीरपणे मन्नत मध्ये राहत आहे. कॅग रिपोर्टचे पुरावे आहेत. ते मी उद्या सादर करणार आहे. सरकार शिवसेनाचे असो किंवा भाजपचे असो याबाबत काहाही करत नाही, असा आरोपही जाधव यांनी केला.
शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज संदर्भात काही दिवसापूर्वी अडचणीत आला होता. आता बंगल्या संदर्भात पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव तक्रार दाखल करणार आहेत. उद्या ते या संदर्भात पुरावाही सादर करणार आहेत.