भुसावळ (प्रतिनिधी) शिक्षकाना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड -१९ च्या कामातून कार्यमुक्त करा, अशी मागणी भुसावळ प्रोटॉन संघटनेने केली आहे.
प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटॉन) कडून भुसावळच्या तहसीलदारांना शुक्रवारी एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपत्तीजनक परिस्थितीत शासनाला अनेक वेळा मदत केलेली आहे. ‘कोविड -१९’ च्या प्रदूर्भावाच्या काळात चेक पोस्ट वरील सेवा, स्वस्त धान्य दुकानावरील सेवा, क्वारंनटाईन सेंटर वरील सेवा, इतकेच नाही तर जीव धोक्यात टाकून आपल्या कुटूंबाचा विचार न करता प्रमाणिकतेने सेवाभावी वृत्तीने घरोघरी जावून सर्वेक्षण केले आहे. आणि अजून ही करीत आहे १५ जून २०२० पासून शाळा महा विद्यालयाचे नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य शिक्षक पार पाडीत आहे. तर प्रवेशा संदर्भातील सर्व ऑफ लाईन प्रक्रिया शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षक राबीत आहे.
शिक्षकांना आपले अध्यापनाचे काम नियमित पणे व सातत्याने पूर्ण करता यावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या, साठी कोविड -१९ च्या संबधीत कार्यासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकाना कामातून कार्यमुक्त करण्यात यावे, अशा प्रकारे शासन निर्णय दि १७ ऑक्टोंबर रोजी काढण्यात आला असून जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी देखील ह्याच शासन आदेशाचा संदर्भ घेत दि २८ ऑक्टोंबर रोजी शिक्षकांना अध्यापनाच्या कामाकरिता कार्यमुक्त करण्यासंदर्भातील पत्र काढलेले आहे. असे असताना देखील ‘शिक्षकांना माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कामे देण्यात येत आहे. त्यामुळे माध्यमिकचे शिक्षण अधिकाऱ्यांनी यांनी काढलेले दि २८ ऑक्टोंबरचे पत्र रद्द झाले का? असा प्रश्न जिल्ह्यात शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. तसेच अनेक ठिकाणी उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना देखील ड्युटी लावलेली असल्याचे समजते. दरम्यान, जेष्ठ शिक्षक श्री सुभाष एस पाटील यांच्या नेतृत्वात भुसावल तहसिलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी दीपक तायडे सर, बाळू लहासे सर, समाधान जाधव सर, बी.डी सुरवाडे सर, योगेश सुरवाडे सर तसेच प्रोटॉन संघटनेचे सचिव जी.पी. काकडे उपस्थित होते.