फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी) शिक्षक लोकशाही आघाडी(टी.डी.एफ) मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यात खुला गट – एकूण सहभागी स्पर्धक १४७, यामध्ये प्रथम – रंजना राजेंद्र ढवळे(कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती)न्यू पनवेल रायगड, द्वितीय – सुजाता हनमघर(ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे) सायन मुंबई, तृतीय – रवी पाटील (प्रतिभाग्रज – भ्रष्टाचार निर्मूलन काळाची गरज) डोंबिवली ठाणे
उत्तेजनार्थ पारितोषिके – अण्णा अभंग( ऑनलाईन शिक्षणाचे फायसे तोटे) संगमनेर अहमदनगर, निमिषा जाधव(संविधान वाचवा…देश वाचवा ) कणकवली सिधुदुर्ग, ईश्वर रामदास महाजन (ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे) अमळनेर, ज्ञानेश्वरी धांडे (भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज) खिरोदा जळगाव
गट इयत्ता ९ वी ते १२ वी निकाल – एकूण सहभागी स्पर्धक २४१, प्रथम – प्रेरणा प्रकाश परदेशी(वृक्षसंवर्धन काळाची गरज) मालेगाव नाशिक , द्वितीय – वैष्णव कैलास वाढेकर(कोरोनामुळे बदललेलं जग) हसनाबाद-जालना, तृतीय लक्षणा बाळकृष्ण कदम(माझी आवड विज्ञान की कला) मानखुर्द, मुंबई.
उत्तेजनार्थ पारितोषिक -सुवर्णा किरण महाजन(ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम) न्हावी जळगाव, आर्या गजेंद्र गडकरी(वृक्षसंवर्धन काळाची गरज) – डोंबिवली ठाणे, वैष्णवी हेमंत बावस्कर(कोरोनमुळे बदललेलं जग) पनवेल रायगड, प्रतीक साहेबराव सुडके(वृक्षसंवर्धन काळाची गरज) नाशिक, साक्षी गुलाब गवळी(ऑनलाईन शिक्षणाचे परिणाम) निफाड, शोभा निकोलस बारला(कोरोनमुळे बदललेलं जग)वाडा डहाणू, कोमल आत्माराम गोरुले(वृक्षसंवर्धन काळाची गरज)संगमेश्वर रत्नागिर या निबंध स्पर्धेत सहभागी सर्व विजेत्यांचे टी.डी.एफ मुंबई अध्यक्ष जनार्दन जंगले व स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सर्व स्पर्धकांना सहभागी झाल्याबद्दल आकर्षक प्रमाणपत्र मेल किंवा व्हाटस् अपद्वारे दिवाळीनंतर पाठविण्यात येईल तर विजेत्यांचा लॉक डाऊन उठल्यावर मुंबई ला कार्यक्रम आयोजित करून बक्षिसे वितरित करून सन्मान करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड येथे कार्यक्रम घेऊन देण्यात येतील असे जंगले यांनी कळविले आहे.