साकळी (प्रतिनिधी) येथे मागील आठवड्यापासून दर रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र आज (दि २७) रोजी गावातील काही दुकाने सुरू असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात व्यावसायिक व ग्रामस्थांमध्ये बैठक घेऊन घेण्यात आला होता. त्यासंबंधी गावात दवंडी फिरवून सूचित ही करण्यात आले होते. परंतू आज ग्रामपंचायत समोरील काही मास विक्रेचे दुकान व अक्सानगरातील किराणा दुकाने सुरू असल्याने दिसून आले. त्यामुळे रविवारी आयोजित केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ चा काय उपयोग ? असा प्रश्न नाराज व्यवसायिकांमधून व्यक्त करण्यात आला.
व्यवसायिकांच्या नाराजीची महसूल व ग्रामपंचायत कडून दखल
गावात ‘जनता कर्फ्यू’चे आयोजन करण्यात आले असूनही काही दुकाने सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर तलाठी, ग्रामपंचायत लिपिक, पोलिस कर्मचारी यांनी गावात पाहणी करून एका मास विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी तलाठी व्ही.एस.वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, साहेबराव बडगुजर, शरद बिऱ्हाडे, सै अश्फाक सै शोकात, लिपिक पंढरीनाथ बोरसे, वरीष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली कोतवाल गणेश महाजन, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.