जळगाव (प्रतिनिधी) सध्या फेसबुकवर विविध चॅलेंजचे ट्रेंड सुरु आहेत. त्यामुळे युझर्स आपले विविध फोटो टाकून एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देत आहे. मात्र, या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतो, असे सांगत जळगाव पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे.
सध्या फेसबुकवर विविध चॅलेंजचे ट्रेंड सुरु आहेत. त्यात प्रामुख्याने #coplechallenge, #familychallenge, #singlechallenge, #doughterchallenge यांचा समावेश आहे. परंतू याबाबत जळगाव पोलिसांनी फेसबुकद्वारे सावधगिरीचा इशारा दिला असून, तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून आपल्याला मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतो. अशा चॅलेंजमुळे आपल्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. सायबर गुन्हेगारांना अशा चॅलेंजमुळे आपल्या परिवारातील फोटो सहज मिळू शकतात. सायबर गुन्हेगार अशा प्रकारचे फोटो मिळवून गैर वापर करू शकतात. त्यामुळे अशा ट्रेंडमध्ये आपले फोटो टाकण्याअगोदर विचार करावे, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.
असा होऊ शकतो गैरवापर
विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसऱ्या महिलांचे मार्फ (एडिट) करून ते अश्लील छायाचित्र नातेवाइकांना किंवा मित्र परिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. एवढेच नव्ह तर तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.