हाथरस (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील १९ वर्षीय पीडितेचं अंत्यसंस्कार आमचे म्हणणे न ऐकता पोलिसांनीच केले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचे अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचे म्हणणे न ऐकता पोलिसांनीच केल्याचा आरोप पीडितेच्या परिवारानं केले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत की बेटी’ वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवले जातेय आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय. युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असे देखील ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. दरम्यान, हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
भारत की एक बेटी का रेप-क़त्ल किया जाता है, तथ्य दबाए जाते हैं और अन्त में उसके परिवार से अंतिम संस्कार का हक़ भी छीन लिया जाता है।
ये अपमानजनक और अन्यायपूर्ण है।#HathrasHorrorShocksIndia pic.twitter.com/SusyKV6CfE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 30, 2020