हिंगोणा ता. यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील अंजाळे येथील जगन्नाथ महाराज व जोग महाराज आळंदी यांच्या पादुका पुजन सोहळा हिंगोणा येथे संपन्न झाला. ह.भ.प.गौरव महाराज हिंगोणेकर यांच्या संकल्पनेतून जगन्नाथ महाराज अंजाळेकर व जोग महाराज यांचे गावकऱ्यांच्या सहकार्यने भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येत आहे. संकल्प पुर्तीसाठी नुकताच पादुका पुजन सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी मुख्य पादुका पुजन ह.भ.प. रविंद्र वारके व शालिनिताई हिंगोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प.पराग महाराज, भालोद व ह.भ.प.दगडू महाराज बामणोदकर यांचे प्रवचन झाले. प्रसंगी विशाल हिरामण वारके, ज्ञानेश्वर झांबरे, आदित्य महाले, छगन गाजरे, प्रकाश पाटील, अशोक गंगाराम पाटील, गोविंदा भोळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.