TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील १० हजार भाविकांना घडणार पंढरीच्या विठुरायाचे दर्शन ; दोन विशेष रेल्वेंची खास व्यवस्था !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सलग ५ व्या वर्षाचा उपक्रम !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in Uncategorized, चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव पंचक्रोशीला पंढरपुरच्या वारीची अशी मोठी परंपरा आहे. टिळक चौकातील तीनशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदीर, या परंपरेचे प्रतिक म्हणता येईल. वै. ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी पंढरपुर वारीचा पाया रचला तर बेलदारवाडी येथील सिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. १००८ महामंडलेश्वर ज्ञानेश्वर माऊली यांनी यावर कळस चढविला. गावोगावी अलंकापुरीची वारी करणारे असंख्य कुटूंबे, परिवार आहे. वारकरी कुटुंबाचा वारसा असणारें आमदार मंगेश चव्हाण यांनी २०१९ पासून चाळीसगाव मतदारसंघातील हजारो वारकऱ्यांसाठी “भक्ती जेष्ठांची… वारी पंढरीची” हा अभिनव उपक्रम सुरु केला. परिस्थितीमुळे असो की वेळेमुळे असो ज्यांना पंढरीची वारी शक्य नाही अश्या भाविकांना मोफत प्रवास, जेवण, निवास व्यवस्था आदींच्या माध्यमातून पंढरीचे दर्शन घडविले जाते, २०१९ पासून कोविड काळातील खंड वगळता आतापर्यंत १२००० हून अधिक भाविकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी पंढरपूर नेले आहे.

यावर्षी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे वारकऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून शनिवार दि.६ जुलै व दि.९ जुलै रोजी विशेष रेल्वेने १० हजार वारकरी भाविकांना पंढरपूर नेण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्यासाठी पंढरपूर वारी नियोजन समिती, भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हजारो वारकऱ्यांच्या नामघोषात यावर्षीही पंढरी दुमदुमणार आहे.

READ ALSO

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

असा असेल पंढरपूर वारीचा प्रवास –
विशेष रेल्वे क्रमांक १ – शनिवार दि.६ जुलै २०२४ व विशेष रेल्वे क्रमांक २ – मंगळवार दि.९ जुलै २०२४ सायंकाळी ५ वा – छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आमदार मंगेशदादा चव्हाण व वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व पालखीचे चाळीसगाव रेल्वेस्टेशनकडे प्रस्थान रात्री ७ वा. – चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून विशेष ट्रेनने वारीला सुरुवात. रविवार दि.७ जुलै २०२४ व बुधवार दि.१० जुलै २०२४ सकाळी ६ वा. – पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे विशेष ट्रेनचे आगमन व पायी चालत श्री.शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूरकडे प्रस्थान. सकाळी १० ते संध्या.४ वा. – सवडीनुसार चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन सायंकाळी ४ वा. – श्री शनि महाराज मठ येथे सामूहिक हरिपाठ व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा वारकऱ्यांशी संवाद, संध्याकाळी ७ वाजता – श्री शनि महाराज मठ येथून पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे पायी चालत प्रस्थान व विशेष ट्रेनने परतीच्या प्रवासाला सुरुवात (दि.७ जुलै व दि.१० जुलै २०२४ रोजी पंढरपूर येथे चाळीसगाव येथून आलेल्या वारकऱ्यांसाठी भोजनाची वेळ – सकाळी ८ ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री शनि महाराज संस्थान मठ, सांगोला रोड, पंढरपूर येथे राहील)

हजारो वारकऱ्याना पंढरीचे दर्शन हा माझ्यासाठी पांडुरंगाचाच आशिर्वाद – आमदार मंगेश चव्हाण !
पंढरपूर वारीची पालखी २०१९ मध्ये मी पहिल्यांदा खांद्यावर घेतली. २३०० ज्येष्ठ नागरिकांना लक्झरी बसव्दारे पंढरपुरात नेले. विठूरायाच्या दर्शनाने ते सुखावले. पांडुरंगांच्या आशिर्वादाने माझ्यासाठी विधानसभेचे दरवाजे उघडले गेले. सर्वसामान्य कष्टकरी, वारक-याचा मुलगा आमदार झाला. गेल्या दोन वर्षांपासून २४ डबे असणा-या विशेष रेल्वेने हजारो भाविकांना घेऊन ‘चाळीसगाव ते पंढरपूर’ वारी आयोजित केली होती. त्यांच्या प्रवासासोबतच चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आदी उपलब्ध करून दिल्या जातात. यावर्षी चाळीसगाव शहर व शहरालगत असणारी गावे यांच्यासाठी १ तसेच इतर उर्वरित ग्रामीण भागातील गावे यांच्यासाठी १ अश्या एकूण दोन विशेष रेल्वेंच्या माध्यमातून १० हजार वारकरी मायबापांना पंढरीचे दर्शन घडविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

July 10, 2026
धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुलै 2026 !

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांचा सत्कार !

September 19, 2021

उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा कृती कार्यक्रम आखा: ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिले आदेश

November 5, 2020

घरफोडी करणाऱ्यांना एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात केली अटक !

July 15, 2025

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group