अमळनेर (प्रतिनिधी) शहरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अमळनेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे १० हजार किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
कैलास शिवराम भाई ( वय २८, रा. इहदरी ता कफराड जि.बलसाड), वसंत कालसिंग मुलकाशा (वय २३, रा. कावडझिरी ता.धारणी, जि.अमरावती) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पैलाड भागात दोन जण नकली नोटा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पथकाने भोला टेलर यांच्या दुकानाजवळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. त्यांची दुचाकी (क्र. एम.एच.२७, डीसी ७०५३) व दोन मोबाइल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.