बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये एकाच अपार्टमेंटमध्ये १०३ रहिवासी कोरोना संक्रमित आढळले आहेत. या अपार्टमेंटमध्ये दोन मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या अपार्टमेंटमध्ये मोठ्या संख्येत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील या कॉम्प्लेक्समध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये १०३ जण पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. यामध्ये वृद्धांची संख्या अधिक असल्याचीही माहिती समोर येते आहे. बेंगळुरूतील बोम्मनाहल्ली परिसरातील लेकव्ह्यू या अपार्टमेंटमध्ये १०३ रुग्ण सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. तर या अपार्टमेंटमध्ये एकूण १०५२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी १०३ जणं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यापैकी एकाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून इतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.