TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१० वी आणि १२ वीची परीक्षा पुढे ढकलली ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून १० वी आणि १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच एमपीएससी परीक्षा देखील काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून खबरदारी म्हणून राज्य शासनाकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ITI परिसर, जामनेर रोड, भुसावळ येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धर्म भांडण करायला शिकवत नाही : एकनाथराव खडसे

May 1, 2022

आर्यनला पाहून शाहरुखानचा अश्रूंचा बांध फुटला ; तुरुंग अधिकाऱ्यांनी केलं शांत

October 22, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 मार्च 2025

March 4, 2025

साखळी ओढून रेल्वेचा खोळंबा, ७९३ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल ; पावणेतीन लाखांचा दंड !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group