मुंबई (वृत्तसंस्था) हेडक्वार्टर सदर्न कमांड पुणे यांनी कनिष्ठ हिंदी अनुवादकासह (Junior Hindi Translator) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ambala.cantt.gov.in वर १५ जानेवारी २०२२ पर्यत अर्ज करू शकतात.
अशी आहे रिक्त पदांची संख्या
उपविभागीय अधिकारी (II) : ८९ पदे
कनिष्ठ हिंदी अनुवादक : ७ पदे
हिंदी टायपिस्ट : १ पद
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक या पदांसाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना https://ambala.cantt.gov.in/wp-content/uploads/sites/40/2021/12/detailed-advt-021221-eng.pdf पाहू शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे यादरम्यान असावे. उमेदवाराचे वय १५ जानेवारी २०२२ पासून मोजले जाईल. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत दिली जाणार आहे.
अशी राहील निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटद्वारे दिले जाईल.