चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकूण ११ गुन्हेगारांना जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या निर्देशानुसार हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश काल काढण्यात आले असून आज पोलीस प्रशासनाने हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एकूण ११ गुन्हेगारांना जिल्हा प्रशासनाकडून हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आता या गुन्हेगारांना दुसऱ्या जिल्ह्यात सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
११ गुन्हेगार हद्दपार
या आदेशात चाळीसगाव शहरातील नदीमखान साबीरखान रा. हुडको, (हद्दपार जिल्हे – नाशिक व जळगाव), सुलतान शेख रहेमान रा. हुडको (हद्दपार जिल्हे- नाशिक व जळगाव), वाजिद खान साबीदखान रा. हुडको (हद्दपार जिल्हे – नाशिक व जळगाव), शोएब शेख अस्लम हुडको (हद्दपार जिल्हे- नाशिक व जळगाव), अक्षय भानुदास पाटील रा. लक्ष्मीनगर (हद्दपार जिल्हे, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार व औरंगाबाद), दानिश शेख अस्लम रा. नागदरोड (हद्दपार जिल्हे, जळगाव, धुळे नाशिक व औरंगाबाद), सिध्दांत आनंदा उर्फ अण्णा कोळी रा. छाजेड मील मागे (हद्दपार जिल्हा जळगाव), सौरभ आनंदा उर्फ अण्णा कोळी रा. छाजेड मील मागे (हद्दपार जिल्हा जळगाव), मोहन रमेश चव्हाण रा.रामनगर (हद्दपार जिल्हा जळगाव), पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण रा. रामनगर (हद्दपार जिल्हा जळगाव) व रोशन रमेश चव्हाण रा. रामनगर (हद्दपार जिल्हा जळगाव) आदींचा त्यात समावेश आहे.