पटना (वृत्तसंस्था) भारताचा प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला २०१४ नंतर एक प्रकारे गळतीच लागली आहे. आता बिहारमध्ये काँग्रेसला खिंडार पडण्याच्या बेतात आहे. एका कॉंग्रेस नेत्यानं याबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पक्षातील ११ आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, कॉंग्रेस नेते भरत सिंह यांनी हा धक्कादायक केला आहे.
बिहारच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे. जवळपास ११ काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडणार असून ११ आमदार पक्ष सोडणार आहे, असे भरत सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे. १९ आमदारांपैकी ११ आमदार असे आहेत की, जे काँग्रेस पक्षाचे नाहीत. मात्र, निवडणुका जिंकल्या आहेत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट खरेदी केले आणि आता आमदार बनले आहेत. संख्याबळाने स्वत:ला मजबूत करण्यासाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, जे ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत. त्यांचे मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हे आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांचे नामाकंन अद्याप बाकी आहे. त्यामुळे सदानंद सिंह आणि मदन मोहन झा हे राज्यपाल कोठ्यातून आमदार होण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप भरत सिंह यांनी केला. तसेच, सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या आरजेडीसोबत असलेल्या महाआघाडीला विरोध केला आहे. अनेक वर्षांपासून मी आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा विरोध केला आहे, असे भरत सिंह म्हणाले.
शक्ती सिंह यांनीही दिला पदाचा राजीनामा
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांच्या राजीनाम्याला संमती दिली आहे. गोहिल यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त करून त्यांच्या जागी भक्त चरण दास यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी शक्ती सिंह गोहिल यांनी पक्षाच्या नेतृत्वाला बिहार प्रभारीपदाची जबाबदारीतून मुक्त करावं आणि कमी जबाबदारीचं पद द्यावं, अशी विनंती केली होती. कॉंग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेचे खासदार शक्ती सिंह गोहिल यांची इच्छा मान्य करत त्यांची बिहार प्रभारी पदावरून मुक्तता केली जात आहे. तसेच त्यांच्या जागी आता ही जबाबदारी भक्त चरणदास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.