जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११६७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११७६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सतरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २६०, जळगाव ग्रामीण-४४, भुसावळ- १८०, अमळनेर-७५, चोपडा-१६३, पाचोरा-४४, भडगाव-3४, धरणगाव-६०, यावल-४७, एरंडोल-४१, जामनेर-७४, रावेर-३९, पारोळा-०५, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-४४, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ९९ हजार ४५६ पर्यंत पोहचली असून ८५ हजार ९८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सतरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १७५८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७०९ रुग्ण सध्या उपचार घेताय.
















